महाराष्ट्र

maharashtra

मालगाडीचा इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

गेल्या काही महिन्यांपासून सतत मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड ( Technical failure in freight engine mumbai) होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच प्रवाशांना लेटमार्क लागत आहे. त्याचबरोबर लोकलचे वेळापत्रकही कोसळत आहे.

By

Published : Dec 29, 2021, 4:10 PM IST

Published : Dec 29, 2021, 4:10 PM IST

मुंबई:मध्य रेल्वेवरील ( Central Railway mumbai ) तानशेत ते खर्डी स्थानकादरम्यान सकाळच्या सुमारास एका मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती. तसेच कसाराकडे जाणारी एक्सप्रेस सेवा ( Express service to Kasara ) , उपनगरीय लोकलचे वेळापत्रक ( Schedule of Suburban Local ) कोलमडले होते. मात्र, अवघ्या काही मिनिटात रेल्वेने जोड इंजिन पाठवून मालगाडी हलविण्यात आली आहे. ही घटना ऐन गर्दीच्या वेळी घडल्याने रेल्वे प्रवाशांना चांगल्याच मनस्तापाला समोर जावे लागले होते.

लोकल प्रवाशांचे प्रचंड हाल -

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजून 45 मिनिटाच्या सुमारास कसाराच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाली होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथकासह जोड इंजिन घटना स्थळी पाठविण्यात आले होते. काही कालावधीतच जोड इंजिन लावून मालगाडी मार्गस्थ करण्यात आली. परंतु एकाच ठिकाणी लोकल आणि मेल एक्स्प्रेस बराच वेळ थांबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे कसाराकडे जाणारी एक्सप्रेस सेवा आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकाला मोठा फटका बसला आहे.

प्रवाशांना लागला लेटमार्क -

ही घटना सकाळी घडली होती. त्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या एक्सप्रेस सेवा आणि उपनगरीय लोकल सेवा अर्धा तास ठप्प होती. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या प्रवाशांना लेट मार्क लागलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details