मुंबई- पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी हिची देखील चौकशी झाली आहे. तसेच जामीनावर बाहेर असलेल्या तन्वीर हाशमी याची देखील पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांना दिलेल्या जबाबात तन्वीर हाशमी म्हणाला की राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नाहीत, तर न्युडिटी वाले सिनेमे बनवत होते. त्याला स्वॉफ्ट पॉर्न म्हणतात. तन्वीर याची पोलिसांनी रविवारी 3 तास चौकशी केली.
राज कुंद्रा याला कधीच भेटलो नाही
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तन्वीर याला राज कुंद्रासोबत भेट झाली होती का याची विचारणा केली. तेव्हा तन्वीर याने पोलिसांना स्पष्ट सांगितले, की मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच राज कुंद्रा याला भेटलो नाही.