मुंबई - ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारने दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ( Supreme Court rejected obc reservation petition ) असून ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले.
हेही वाचा -Maharashtra leaders on OBC Reservation Update : ओबीसी आरक्षणासंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रीया
केंद्र सरकारकडे असलेला इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला देण्यात यावा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. या मागण्यांसाठी राज्य सरकारने हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या मागण्यांची याचिका ( OBC Reservation Petition ) फेटाळल्याने राज्य सरकारला हा मोठा धक्का समजला जात आहे.
आरक्षण देण्याआधी ट्रिपल टेस्ट गरजेचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच, केंद्र सरकारकडे असलेल्या इम्पेरिकल डेटा केंद्र राज्य सरकारला देऊ शकत नाही, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे, पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे असलेले इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला मिळणार नाही, हे स्पष्ट झाल आहे.
काय झाले आज कोर्टाच्या सुनावणीत?
1. केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला द्यावा जेणेकरून राज्य सरकारला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण नियमित करता येईल, अशी मागणी राज्य सरकारकडून आज करण्यात आली.