मुंबई -२८ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi government ) दोन वर्षे पूर्ण झाली. पण त्या अगोदर २३ नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) व राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी घेतलेल्या शपथविधीला सुद्धा दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु आजही त्या शपथविधीचा पश्चाताप होतो, असे मत देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
'शिवसेनेने दगाफटका केल्याने शपथविधी'
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ घेण्याच्या निर्णयावरुन पश्चात्ताप व्यक्त केला आहे. फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, शिवसेनाने दगाफटका दिल्यानंतर आम्ही अजित पवार बरोबर एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला होता. परंतु त्यानंतर जे काही झाले त्या कारणाने आम्हाला आजही त्या शपथविधीचा पश्चाताप होत आहे, असे फडवणीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी देशभर गाजला होता. या शपथविधीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली होती. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी या तिन्ही पक्षांचे नेतृत्व करत आपल्याहाती सूत्र घेतल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसण्यास मजबूर केले होत.
'या सर्वांवर एक पुस्तक लिहणार'