महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजापूर रिफायनरी'प्रकल्प हातातून गमावणे महाराष्ट्राला परवडणार नाही - राज ठाकरे

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला.राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांना लिहले आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे

By

Published : Mar 7, 2021, 12:30 PM IST

Updated : Mar 7, 2021, 1:08 PM IST

मुंबई- कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल, ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हीत लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करणारे पत्र महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

शेजारची राज्ये महाराष्ट्राच्या घशात हात प्रकल्प घेऊन जात आहेत. अशा परिस्थिती महाराष्ट्रातून कोट्यवधीची गुतंवणूक असलेला प्रकल्प कोकणातून बाहेर जाता कामा नये, याकडे गाभीर्यांने लक्ष देणे गरजे आहे. नाही तर औद्योगिकरणात महाराष्ट्र अग्रेसर ही ओळख पुसायला वेळ लागणार नसल्याची भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

काय म्हटले आहे पत्रात -

आज कोकण आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्याशी निगडीत हा विषय असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी नाणार बाबत लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाणार सारखा प्रकल्प हातून गेला तर ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. नाणारला होत असलेल्या विरोधाबाबत स्थानिक भूमिपुत्रांचे म्हणणे रास्त आहे. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदलली असल्याच्या मुद्द्याकडेही राज यांनी लक्ष वेधले आहे.

पर्यटन हा कोकणाचा श्वास होऊ शकतो-

कोकणावर निसर्गाने सौदर्यांची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. तिन्ही ऋृतूत कोकण सुंदर दिसू शकतो, त्यामुळेच पर्यटन हा कोकण आणि कोकणी माणासाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो. कोकणाचे कॅलिफोर्निया होणार असे सांगितले जाते. मात्र, या ठिकाणी विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही, कोकणच जगासाठी पर्यटनाचे मॉडेल होऊ शकते. मात्र, त्या दृष्टीने समग्र विचार होण्याची गरज असल्याचे मतही राज ठाकरे यांनी लिहलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

कोकणभूमीने ७ भारत रत्न दिल्याचा उल्लेख करत राज ठाकरे पुढे म्हणालेत की, सध्या कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे, नोकरीसाठी त्याला शहराची वाट धरावी लागत आहे. पर्यटन कोकणाचे भवित्यव्य बदलू शकतो, पण त्यावर नीट विचार झाला नसल्याकडेही राज यांनी लक्ष वेधले आहे.

बाजूची राज्ये महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवण्यासाठी टपलेत-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे चित्र बदलले आहे. देशात परकीय उद्योगांच्या गुतवणुकीसाठी सर्वच राज्यामध्ये जीवघेणी स्पर्धा लागली आहे. मध्यतंरी एक आतंराष्ट्रीय बंगळुरूला गेला, तो महाराष्ट्र परत येण्यासाठी सरकार धडपड करत आहे, हे क्लेशदायक असल्याचेही मत राज ठाकरे यांनी टेस्ला प्रकल्पावरून व्यक्त केले आहे. आजुबाजूची राज्ये महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपले आहेत., अशा वेळी महाराष्ट्राने नाणार सारखा तीनलाख कोटींचा प्रकल्प हातातून गमावून नये आणि ते महाराष्ट्राला परवडणारे नसल्याचे राज यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची ती ओळख पुसेल-

या प्रकल्पाला भूमिपुत्रांचा विरोध होता, तो रास्तच होता. त्यांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नव निर्माण सेनेसह सर्व राजकीय पक्ष भूमिपुत्राच्या मागे उभे राहिले होते. मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही उद्योग, प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर जाणे राज्याला परवडणारे नाही. अन्यथा 'औद्यागिकऱणात अग्रेसर महाराष्ट्र' ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही, अशी चिंताही राज यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

कोरोना काळानंतर परिस्थिती वेगळी-

कोरोना काळानंतर लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत राज्य ठामपणे उभे करण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टीकोणातून या उद्योगाकडे आणि प्रकल्पांकडे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे जो रोजगार निर्माण होईल, त्यात कोकणी माणसाला आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांना प्राधान्य असायला हवे, असा गुतवणूकदार कंपनीसोबत करार करायला हवा, त्या दृष्टीने कोकणी तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थाही उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विचार करायला हवा, असेही राज ठाकरे यांनी राज्यातील नेत्यांना सूचित केले आहे.

तर मनसेशी संघर्षाशी तयारी ठेवावी-

पर्यावरणीय चिंता समजू शकतो, मात्र, यासाठी तज्ज्ञाची मते ग्राह्य धरायला हवी असल्याचेही मत ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे जो प्रकल्प रोजगाराच्या संधी अमर्याद संधी आणेल तो आपण स्वीकारण्याची ही आजची गरज आहे. त्यासाठी कोकणातील तरुणांनी पुढाकार घेऊन संधीचे सोनं करतील. आणि त्यांच्या आडवे कोणी जाणार असेल तर त्या लोकांनी मनसेशी संघर्षाशी तयारी ठेवावी, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज्य सरकारने सामंज्यसाची भूमिका घ्यावी-

शिवसेनेचा या प्रकल्पास विऱोध आहे, मात्र, राज ठाकरे यांनी या पत्रात राज्य सरकारने सामंज्यसाची भूमिका घेऊन तज्ञाच्या मदतीने स्थानिकांची मते बदलावी, असे आवाहन केले आहे.

Last Updated : Mar 7, 2021, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details