महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 3, 2021, 8:46 PM IST

Updated : Nov 3, 2021, 8:58 PM IST

ETV Bharat / city

तोट्यातील लालपरी दिवाळीत सुसाट.. एकट्या मुंबई विभागातून ४६ लाखापेक्षा जास्त महसूल !

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने १७ टक्के भाडेवाढ केली असली तरी, मात्र, प्रवाशांनी एसटीलाच पसंती दिली आहे. एसटी महामंडळाचा मुंबई विभागातून २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यत ६ हजार ६७५ तिकीट विक्री झाली असून ४७ लाख ६८ हजार २४० महसूल गोळा झालेला आहे.

ST Corporation profits in Diwali
ST Corporation profits in Diwali

मुंबई -ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने १७ टक्के भाडेवाढ केली असली तरी, मात्र, प्रवाशांनी एसटीलाच पसंती दिली आहे. एसटी महामंडळाचा मुंबई विभागातून २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यत ६ हजार ६७५ तिकीट विक्री झाली असून ४७ लाख ६८ हजार २४० महसूल गोळा झालेला आहे. राज्यभरात सुद्धा प्रवाशांकडून एसटी बसेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रवाशांना आर्थिक भुर्दंड -

कोरोनाचा प्रकोप कमी होवून आता जनजीवन पूर्वपदावर येत असून राज्याची लाईफ-लाईन असणारी एसटी अर्थात लालपरी देखील वेग घेऊ लागली आहे. कोरोनामुळे आर्थिक अनिष्टतेच्या चक्रात सापडलेल्या एसटी महामंडळाला येणार्‍या दिवाळी सणाकडून मोठी अपेक्षा होती. त्यानुसार, एसटी महामंडळाने दिवाळीत अतिरिक्त बस गाड्या सुद्धा चालविण्यांत येत आहेत. याशिवाय, गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागलेला आहे.आता त्यातच सततच्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने ऐन दिवाळीत एसटीच्या तिकिटात १७.१७ टक्यांची अधिक वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याने प्रवाशांनी एसटी बस गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले आहे. यातून एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.

तोट्यातील लालपरी दिवाळीत सुसाट

हे ही वाचा -इंदोरीकर महाराजांना लसीचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व पटवून देईल - आरोग्यमंत्री

मुंबईत एसटीला तुफान प्रतिसाद -

एसटी महामंडळाचा मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल आगार, परळ आगार, दादर आगार आणि कुर्ला नेहरूनगर आगरमधून २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यतचा कालावधीत ६ हजार ६७५ तिकीट विक्री झाली असून ४६ लाख ६८ हजार २४० महसूल गोळा झालेला आहे. तर ११ हजार ५४४ प्रवाशांनी या कालावधीत एसटीतून प्रवास केला आहे. राज्यभरात सुद्धा प्रवाशांकडून एसटी बसेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, बेकायदेशीर सुरु असलेल्या संपामुळे राज्यातील काही जिल्हातील नागरिकांना एसटीची तिकीटे रद्द करण्याची वेळ आली आहे.

संपामुळे प्रवाशांची लूट सुरु -

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण पुकारले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले होते. तरीही काही आगारांमध्ये नियमबाह्य आंदोलन, संप, निर्देशने सुरू आहेत. गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील ३५ आगार बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतुकीने दुप्पट दर आकारात नागरिकांची लुट सुरु केली आहे.

Last Updated : Nov 3, 2021, 8:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details