महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Janakrosh Agitation Pune : शिवसेनेच्या जनआक्रोश आंदोलनाचा टीझर रिलीज

पुण्यात उद्या जनआक्रोश आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. याच संदर्भातील टीझर शिवसेनेनेकडून जारी (Shivsena release Teaser Janakrosh agitation) करण्यात आले आहे. ज्यामध्ये आंदोलनाची वज्रमुठ आवळून शिवसेना मैदानात उतरणार असल्याचे दाखवण्यात आले आहे.

By

Published : Sep 23, 2022, 11:00 AM IST

Updated : Sep 23, 2022, 11:23 AM IST

Shivsena Janakrosh Agitation Pune
Shivsena Janakrosh Agitation Pune

मुंबई - वेदांता प्रकल्पाकाच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. याच संदर्भात उद्या शनिवारी पुण्यात जनआक्रोश आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. याच संदर्भातील टीझर शिवसेनेनेकडून जारी (Shivsena release Teaser Janakrosh agitation) करण्यात आले आहे. ज्यामध्ये आंदोलनाची वज्रमुठ आवळून शिवसेना मैदानात उतरणार असल्याचे दाखवण्यात आले आहे.

शिवसेनेकडून टीझर रिलीज


आज पुण्यात जनआक्रोश आंदोलन -वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. शिवसेना - युवासेनेच्या वतीने याप्रकरणी पुण्यात जनअक्रोश आंदोलन छेडण्यात आले असून आंदोलनाचा पहिला ट्रीझर आज रिलीज करण्यात आला. महाराष्ट्रातील तरुण तरुणीने करायचा काय ? असा संवाल याट्रीझर मधून सरकारला विचारण्यात आला आहे.



पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर आता राज्यात राजकीय वादंग पेटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प राज्यातून गेल्याची जहरी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. तर मविआ सरकारवर मुख्यमंत्री शिंदे खापर फोडत आहेत. राज्यात आरोप - प्रत्यारोपाच्या यावरून फैरी झडत असताना शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प खोके सरकारने गुजरात पाठवला, असा आरोप करत उद्या पुण्यात मावळ पंचायत समिती समोर दुपारी चार वाजता शिवसेनेकडून वेदांता प्रकल्पाबाबत जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना नेते, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन (Shivsena Janakrosh Agitation Pune) होईल.


असा आंदोलनाचा ट्रीझर -महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकोन प्रकल्प खोके सरकारमुळे गुजरात गेल्याने सुमारे 1 लाख तरुणांचा रोजगार गेला. महाराष्ट्रातील तरुण - तरुणाईने करायचं काय.? असा सवाल ट्रीझर मधून विचारण्यात आला आहे. शिवसेना - युवासेनेने या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची वज्रमुठ आवळली आहे. तसेच जित के हारनेवालों को खोके सरकार कहते है, अशी टॅग लाईन वापरली आहे. पुण्यात हे आंदोलन होणार असून याचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता (Shivsena release Teaser Janakrosh agitation pune) आहे. हे आंदोलन उद्या म्हणजेच 24 सप्टेंबरला होईल.

Last Updated : Sep 23, 2022, 11:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details