महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

युतीच्या अधिकृत घोषणेपूर्वीच सेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उमेदवारांना फॉर्म दिले.

युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली

By

Published : Sep 29, 2019, 8:24 PM IST

मुंबई - शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे. घटस्थापनेचा मुहूर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उमेदवारांना फॉर्म दिले.


मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले. याव्यतिरिक्त विविध मतदारसंघातील जे उमेदवार मुंबईमध्ये उपस्थित होते, त्यांना देखील फॉर्म देण्यात आले. सेना-भाजप युतीचा ज्या ठिकाणचा जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. अशाच मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेना एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - आदित्य ठाकरे 3 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज?


हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, कोल्हापूर चंदगडमधून संग्रामसिंग कुपेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा - मनसेत भरती सुरू, विधानसभेसाठी लढवणार 150 जागा


सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली. कागलमधून संजयबाबा घाटगे, चंदगडहून संग्राम कुपेकर, करवीरमधून चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर, शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरोळमधून उल्हास पाटील यांना सेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details