मुंबई - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू असल्याचीही माहिती आहे.
Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांचा गट नरहरी झिरवाळांविरोधात दाखल करणार अविश्वास ठराव
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू असल्याचीही माहिती आहे.
झिरवाळ झाले नॉट रिचेबल -विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे काल ( गुरुवारी ) रात्रीपासून नॉट रिचेबल ( Narhari Zirwal Not Reachable ) झाले होते. त्यांनी आपले संरक्षण सोडले असून आपण अज्ञातस्थळी जात असल्याचे म्हटले होते. शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री हे सुद्धा संरक्षण सोडून परराज्यात गेले आहेत. परराज्यात जाण्यापूर्वी या आमदारांनी आपले संरक्षण मुंबईतच सोडले आणि ते अज्ञात स्थळी गेले. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सध्या सर्व राजकीय घडामोडीसाठी महत्वाची व्यक्ती ठरू लागले होते. नवीन गटनेते पदाची अथवा प्रतोद याची नेमणूक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या सर्व घडामोडीत झिरवाळ यांनी गुरूवारी रात्री अचानक आपले संरक्षण सोडले आणि ते सुद्धा अज्ञात स्थळी गेले होते.
हेही वाचा -Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकी नंतर शरद पवार मातोश्रीबाहेर