महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Deepak Kesarkar Vs Shivsena: दीपक केसरकर संतापले; म्हणाले, 'अनिल परबांचा फोन तपासा, सत्य उघडकीस येईल..'

शिवसेनेतील बंडाळी ( Rebellion in Shiv Sena ) नंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत संभाषण झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. शिवसेनेकडून तो फेटाळला होता. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यावरून आज संताप व्यक्त करत, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ऐवजी अनिल परब (Anil Parab) यांचा फोन तपासा. सगळं उघड होईल, असे खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वादाला तोंड फुटणार आहे.

By

Published : Jul 22, 2022, 7:52 PM IST

Deepak Kesarkar
दीपक केसरकर

मुंबई :शिवसेनेतील ( Rebellion in Shiv Sena ) बंडाळी नंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यात युतीबाबत संभाषण झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. शिवसेनेकडून तो फेटाळला होता. दीपक केसरकर ( Deepak Kesarkar )यांनी यावरून आज संताप व्यक्त करत, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ऐवजी अनिल परब (Anil Parab) यांचा फोन तपासा. सगळं उघड होईल, असे खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वादाला तोंड फुटणार ( Deepak Kesarkar Vs Shivsena ) आहे.




बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र :एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झाले असून, बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. निष्ठा यात्रानंतर, शिवसंवाद यात्रेतून बंडखोरांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपांची आदित्य ठाकरे चिरफाड करत आहेत. ठाकरेंच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमध्ये बंडखोर आमदार सुहास कांदे यांनाही शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे काढता पाय घ्यावा लागला. ठिकठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचे जोरदार स्वागत होत असल्याने, एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करणारा शिंदे गट आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आहे.

युतीच्या मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर :शिवसेना आणि भाजपची युती व्हावी, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करत होते. विधानसभेत भाजप आमदारांवर केलेल्या कारवाईमुळे चर्चा फिस्कटली, असे गंभीर विधान खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. शिवसेनेकडून हे आरोप खोडून काढण्यात आले. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत युतीच्या मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे.

दीपक केसरकर संतापले :शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून, शिंदेला बाजूला ठेवा मी स्वतः तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करूया असे म्हटले होते. शिवसेनेत जे दोन नंबरचे नेते आहेत, तुमचा आदर करतात. त्यांच्याबरोबर असे होत असेल, तर आमच्या सारख्या सर्व सामान्य शिवसैनिकाचं काय होईल? असा प्रश्न दीपक केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणातील सुस्पष्टता समोर आणायची असेल तर अनिल परब यांचा फोन तपासा; त्यातून सगळं उघड होईल, असा दावा केसरकर यांनी केला. त्यामुळे शिवसेना कडून याला कसे प्रत्यूत्तर दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा :Draupadi Murmu : नगरसेविका ते देशाच्या प्रथम नागरिक; वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राजकीय प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details