मुंबई-मनी लॉन्ड्रींग संदर्भात तपास करत असलेल्या ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स बजावण्यात आले आहे. या समन्स नुसार आमदार प्रताप सरनाईक यांना गुरुवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. या अगोदर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग यास ईडी कडून चार वेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र चारही वेळा समन्स देऊनही विहंग सरनाईक हा चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यामुळे विहंग सरनाईक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
सरनाईक हजर रहाणार का?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चौकशीला हजर रहाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्यावेळी त्यांच्या कार्यालयावर छापेमारी झाली होती त्या वेळेस आमदार प्रताप सरनाईक हे शहरात हजर नव्हते. ते ठाण्यात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. तो कालावधी मंगळवारी संपला. दरम्यानच्या काळात प्रताप सरनाईक यांना दुसऱ्यांदा ईडी कडून चौकशीचे समन्स देण्यात आले. त्यानुसार त्यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
विहंग सरनाईक याची झाली आहे 5 तास चौकशी
गेल्या आठवड्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई-ठाणे येथील घर आणि कार्यालयावर ईडीच्या पथकाने छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान टॉप सिक्युरिटीच्या संदर्भात झालेल्या आर्थिक व्यवहार बाबत आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याची तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तब्बल चार वेळा समन्स बजावले होते. मात्र ते हजर राहिले नाहीत.