मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली ( Hearing on Sanjay Raut bail application adjourned ) आहे. या प्रकरणी आता संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी ( Hearing on Sanjay Raut bail application on 27th ) होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनवणी पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राऊत यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला -पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनवणी पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊत ( Sanjay Raut judicial custody extended ) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, काल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 ऑक्टोबरपर्यंत Sanjay Raut judicial custody extended till 4 Octoberवाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी आज संपल्यानंतर त्यांना आज हजर करण्यात आले होते. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम 4 ऑक्टोंबर पर्यंत वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात आर्थिक गैरववार प्रकरणे ईडी कडून अटक करण्यात आले होते आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली असल्याने त्यांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्यात आले त्यावेळी त्यांना न्यायधीस एम जी देशपांडे यांनी 4 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा न्यायालय कोठडी वाढवून दिली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांना यापूर्वी दोन वेळा ईडी कोठडी देण्यात आली होती त्यानंतर त्यांची रवानगी 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यास आली होती आज कोठडी संपली असल्याने त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी-संजय राऊत यांच्या आज सुनावणी होणार असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांचे समर्थनात मुंबई सत्र न्यायालयात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेने गर्दी केली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून मोठा प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. संजय राऊत यांची गाडी सत्र न्यायालयाच्या गेटवर आली असता शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीदेखील करण्यात आली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना आज न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे नेते राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्र सत्र न्यायालयमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली आहे.