मुंबई -तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने भाजप नेत्यांविरोधात चौकशी सुरू (Investigation of BJP leaders ) केली होती. फोन टॅपिंग प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) आणि कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये ( Kothrud Police Station ) गिरीश महाजन यांची पोलीस विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने या दोन्हीही प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाकडे वर्ग केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली ( Phone Tapping Case Handed Over To CBI ) आहे. त्यामुळे शिंदे सरकारने पुन्हा ठाकरे सरकारला धक्का दिला आहे.
फोन टॅपिंग प्रकरण -महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणाचा ( Phone tapping cases ) प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS officer Rashmi Shukla ) यांच्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे फोन टायपिंग करण्याचा आरोप करत पुणे आणि मुंबई गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता शिंदे सरकारने हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाकडे वर्ग केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई आणि पुण्यात गुन्हे दाखल -फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या फोन टायपिंग केले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी मुंबई आणि पुणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यात तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्य साक्षीदार असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता.
नेत्यांचे जबाब नोंदवले -फडणवीस यांच्यासह पोलिस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी रश्मी शुक्ला यांच्यासर शिवसेना नेते संजय राऊत, राष्टवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर पुणे पोलिसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जबाब नोंदवला होता. मात्र, अद्याप दोषारोपपत्र दाखल केलेले नव्हते.
सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश - त्याचबरोबर जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवत मारहाण करीत पाच लाखांची खंडणी घेण्यात आली. याप्रकरणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगावमधील 29 जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपासही सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेशही सरकारने दिले असल्याचे सूत्रांनी म्हटले असून याची कागदोपत्री पूर्तता होणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब नोंदवला -आयपीएस रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकणात बीकेसी सायबर सेल पोलिसांकडून कुलाबा पोलिसांकडे काही महिवन्यांपूर्वी प्रकरण वर्ग ( Phone tapping case class to Colaba police ) करण्यात आले होते. गोपनीय अहवाल लिक प्रकरणात बीकेसी सायबर सेलकडून अगोदरच तपास सुरू होता. या प्रकरणात सायबर सेलकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला होता. हा अहवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला होता. याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचादेखील सायबर सेल पोलिसांकडून चौकशीदरम्यान ( Reported by Devendra Fadnavis ) जबाब नोंदवण्यात आला . कुलाबा पोलिसांकडूनही या पूर्वी फोन टॅपिंगप्रकरणी चौकशी सुरू होती.
हेही वाचा -Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'