मुंबई- पवारसाहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली आहे. दोन दिवसात वेळ मिळेल त्यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का द्यायला हवी? हे पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना समजून सांगणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी पवारसाहेब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब सतत दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. यावेळी पवारसाहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब सतत दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. यावेळी पवारसाहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
चारा छावण्या असतील किंवा जनावरांना पाण्याची व्यवस्था असेल याकडे सरकारने पाहिजे तसे लक्ष दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या बागा सुकल्या आहेत. या बागा सुकल्यामुळे येणार्या काळात त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी पक्षाची मागणी असल्याचे मलिक यांनी सांगितले.