महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amit Shah Security Breach : गृहमंत्री अमित शाह यांची सुरक्षा व्यवस्था भेदली.. संशयिताला पोलिसांकडून अटक

Amit Shah Security Breach गृहमंत्री अमित शाह union home minister amit shah यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली amit shah mumbai tour आहे. खासदाराचा स्वीय सहायक असल्याचे सांगत एक व्यक्ती अमित शाह यांच्याभोवती फिरत होता. या संशयित व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली mumbai police arrested one suspected असून त्याची चौकशी सुरु आहे.

Amit Shah Security Breach
Amit Shah Security Breach

By

Published : Sep 8, 2022, 9:28 AM IST

Updated : Sep 8, 2022, 9:37 AM IST

मुंबई : Amit Shah Security Breach केंद्रीय गृहमंत्री अमित शाह union home minister amit shah यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली amit shah mumbai tour आहे. खासदाराचा स्वीय सहायक असल्याचे सांगत एक व्यक्ती अमित शाह यांच्याभोवती फिरत होता. या संशयित व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली mumbai police arrested one suspected असून त्याची चौकशी सुरु आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 5 सप्टेंबरला मुंबई दौरा केला. या दौऱ्यासंदर्भात आता एक मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. एक अनोळखी व्यक्ती अमित शहांच्या जवळ फिरत होता. मुंबई पोलिसांनी हेमंत पवार नावाच्या या व्यक्तिस अटक केली आहे. या व्यक्तीनं आपण आंध्रप्रदेशातील एका खासदाराचा पीएस असल्याचं सुरक्षारक्षकांना भासवलं आणि बराच वेळ तो अमित शाहांच्या अवती-भोवती फिरत होता.

मुंबई पोलीस हेमंत पवार या आरोपीची सखोल चौकशी करत असून अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. अमित शाहांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर विले पार्ले येथील आशीष शेलार यांच्या मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. नंतर पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित देखील केलं होतं. अमित शहांच्या मुंबईतील या दौऱ्यात संबंधित अनोळखी व्यक्ती शाहांच्या भोवती फिरत होता.

संशय आल्यानंतर मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं हेमंत पवारची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केली आणि गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं संबंधित व्यक्तीला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Last Updated : Sep 8, 2022, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details