मुंबई -सर्वसामान्य लोकांवर आता महागाईचा बोजा वाढणार आहे. बहुतांश एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती पुन्हा १०-१५% पर्यंत वाढवण्याच्या विचारात ( FMCG price hike ) आहेत. गहू, पाम तेल आणि पॅकेजिंग सामग्रीच्या महागाईमुळे कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ होत ( FMCG Companies Plan to Hike Prices ) आहे. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धामुळेही कंपन्यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.
एफएमसीजी वस्तूंच्या किमती महागणार -
युद्धामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. डाबर आणि पारले यासारख्या कंपन्या महागाई कमी करण्यासाठी किमतीत किरकोळ वाढ करतील. एफएमसीजी कंपन्यांनी फेब्रुवारीत साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, शाम्पू, चहा, कॉफी, बिस्कीट, नूडल्स आणि ज्यूससारख्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. या कंपन्यांनी कमोडिटीच्या किमतीतील वाढीचे ओझे ग्राहकांवर टाकले आहे.