मुंबई -राज्यातील सत्ता स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना व भाजपमधील संघर्ष पेटला असून आज शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ते भांडुप येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यपालांची सदिच्छा भेट... मात्र ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच - संजय राऊत
राज्यातील सत्ता स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना व भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.
आजच्या तरुण भारत वृत्तपत्रात शिवसेना व संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, तरुण भारत वृत्तपत्र आहे, मला लक्ष्यात नाही. सामना वृत्तपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाचन करत नाहीत असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
आजची राज्यपालांच्या भेटीत राज्यातील जो सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांना विनंती करणार असल्याचेही म्हणाले. राज्यपाल हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासोबत आमचे चांगले संबंध असल्याने निवडणुकांमुळे त्यांची भेट झाली नाही, त्यामुळे आताची भेट ही सदिच्छा भेट असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.