मुंबई -आत्मनिर्भर भारत (Aatmanir Bharbharat) आणि 'स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन' देण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून रेल्वे मंत्रालयाच्या (Railway Ministry) अंतर्गत मध्य रेल्वेने (Central Railway) मध्य रेल्वेच्या ५ विभागांपैकी पाच स्थानकांवर म्हणजे प्रत्येक एका स्थानकांवर 'एक स्टेशन एक उत्पादन' (One Station One Product) सुरू केले आहे. या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात धारावी चामड्याच्या उत्पादनांचे स्टॉल स्थानिक लेदर उत्पादनांचे (Dharavi leather products) प्रदर्शन, प्रचार आणि विक्री करणार आहे.
एका स्थानकांवर 'एक स्टेशन एक उत्पादन' या स्थानकात उत्पादन वस्तूचे स्टॉल-मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर (छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) स्थानकात 'वन स्टेशन वन प्रोडक्ट' अंतर्गत कोल्हापुरी चप्पल, भुसावळ विभागातील बुरहानपूर स्थानकात बुरहानपूरच्या स्थानिक हस्तकला, सोलापूर स्टेशनात सोलापुरी चादर (वस्त्र) आणि नागपूर स्टेशन येथे बांबू उत्पादनांचे प्रदर्शन, जाहिरात करुन प्रोत्साहन दिले जाईल. ‘एक स्टेशन एक उत्पादन’ अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची योजना सुरुवातीला १५ दिवसांसाठी स्थानकांवर ठेवली जाईल.
रेल्वे स्थानक उत्पादनाचे प्रचार- स्थानिक कारागीर, कुंभार, विणकर/हातमाग विणकर, आदिवासी यांच्यासाठी वाढीव उपजीविका आणि कल्याण प्रदान करण्यासाठी, 'एक स्टेशन एक उत्पादन' धोरण यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले. एक स्थानक -एक उत्पादन ही संकल्पना म्हणून भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर स्थानिक उत्पादनाचा प्रचार करणे हे त्या भागातील रेल्वे स्थानक उत्पादनाचे प्रचार आणि विक्री केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
एका स्थानकांवर 'एक स्टेशन एक उत्पादन' 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट'-'वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट'च्या समान कल्पनेसह, “एक स्टेशन एक उत्पादन” चा फोकस इकोसिस्टम सक्षम करण्यावर आणि उत्पन्न, स्थानिक रोजगार, कौशल्ये आणि उपजीविका सुधारण्यासाठी स्थिर मार्केटिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यावर ठेवला जाईल. देशांतर्गत उद्योगांना बळकटी देण्यासाठी आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ‘आत्म निर्भार भारत अभियान’ या अग्रगण्य मोहिमेच्या संदर्भात ‘एक स्टेशन एक उत्पादन’ आता आणखी महत्त्व आणि प्रासंगिकता प्राप्त करत आहे. या उपक्रमात, स्थानिक कारागिरांना स्वदेशी उत्पादने आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेशनवर उत्पादनांच्या विक्रीसाठी रेल्वे पायाभूत सुविधा आणि इतर सहाय्य प्रदान करेल.
१५ दिवसांची मुदतवाढ - विशेष म्हणजे २५ मार्च २०२२ पासून १५ दिवसांसाठी 'एक स्टेशन एक उत्पादन'चा पायलट प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी देशातील १६ रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून हा पायलट प्रकल्प सुरू करणाऱ्या पहिल्या स्थानकांपैकी मध्य रेल्वेचे नागपूर रेल्वे स्थानक हे होते आणि येथे आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.