मुंबई -सच्चिदानंद पुरीला गावदेवी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 11 एप्रिल) एॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज ( मंगळवार ) संपत असल्याने त्यांना गिरगाव न्यायालयात सुनावणीसाठी पोलिसांनी आणले होते. तेव्हा न्यायालयाच्या आवारात सच्चिदानंद पुरी फेसबूक लाइव्ह करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुरी बुधवारी (दि. 12 एप्रिल) गिरगाव न्यायालयात ( Girgaon Court ) हजर करण्यात येणार आहे.
Sachchidanand Puri Arrested : सच्चिदानंद पुरीला गावदेवी पोलिसांकडून अटक
सच्चिदानंद पुरीला गावदेवी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 11 एप्रिल) एॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्यांना गिरगाव न्यायालयात सुनावणीसाठी पोलिसांनी आणले होते. तेव्हा न्यायालयाच्या आवारात सच्चिदानंद पुरी फेसबूक लाइव्ह करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुरी बुधवारी (दि. 12 एप्रिल) गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुरी याचे फेसबूक खाते सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडून तपासण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सच्चिदानंद पुरी यासही सहआरोपी केले असून तो फरार असल्याचा युक्तिवाद मुंबई पोलिसांकडून सरकारी वकीलांनी मंगळवारी (दि. 11 एप्रिल) न्यायालयात केला होता. याप्रकरणी आरोपींची संख्या आता 111 वर गेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापासून पुरी आंदोलनात कशाप्रकारे भाग घेत यासर्व बाबीची माहिती पोलीस काढत आहे.
हेही वाचा -Gunaratna Sadavarte Arrest : गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ