महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चार महिन्यांत ७ लाख घरकुलांचे बांधकाम - हसन मुश्रीफ

प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत राज्यात ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम केले असून त्यापैकी ३ लाख ६२१ घरकुले बांधून पूर्ण केली आहेत. चार महिन्यांत ७ लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Rural Development Minister Hasan Mushrif said that 7 lakh houses will be constructed in four months
चार महिन्यांत ७ लाख घरकुलांचे बांधकाम - हसन मुश्रीफ

By

Published : Apr 1, 2021, 7:10 PM IST

मुंबई -राज्यातील ग्रामीण भागात गेल्या चार महिन्यांत ७ लाख ४१ हजार ५४५ घरांपैकी ३ लाख ६२१ घरांचे बांधकामे पूर्ण झाली आहेत. ४ लाख घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ग्रामिण भागात मिळत असलेला उत्तम प्रतिसाद बघता, १ मे २०२१ पर्यंत योजनेला मुदतवाढ दिल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

दरम्यान, ग्रामिण भागातील सर्व बेघरांना आर्दश पध्दतीची घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी महाआवास अभियान मिशन मोडवर राबविण्यात येणार आहे. सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी यात सहभाग घेऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

गवंडी प्रशिक्षण, डेमो हाऊसेसची निर्मिती -

राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देणे, गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२१ या साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या महा आवास अभियानास चांगले यश मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत राज्यात ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम केले असून त्यापैकी ३ लाख ६२१ घरकुले बांधून पूर्ण केली आहेत. ४ लाख ४० हजार ९२४ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या घरकुलांपैकी २ लाख ८२ हजार २३२ घरकुलांचे बांधकाम जोत्यापर्यत तर १ लाख ५८ हजार ६९२घरकुलांचे बांधकाम लिंटेलपर्यंत झाले आहे. ही घरकुले या महिन्यात पूर्ण होतील. अभियान कालावधीत ४२ हजार ६५७ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित ६३ हजार ३४३ भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. अभियान कालावधीमध्ये ३ लाख ८५ हजार ५१८ लाभार्थ्यांच्या घरकुलांना नव्याने मंजूरी देण्यात आली. वेळेत घरकुले पूर्ण व्हावीत व बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये, यासाठी गवंडी प्रशिक्षणही राबविण्यात येत आहे, आजपर्यंत ६ हजार १६५ गवंड्यांना प्रशिक्षण दिले आहे. १५ हजार ८५५ गवंडी प्रशिक्षण प्रगतीपथावर असल्याची माहिती, मुश्रीफ यांनी दिली. लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांबाबतची माहीती करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे डेमो हाऊसेसची उभारणीचे काम सुरू आहेत. आतापर्यंत२१० डेमो हाउसेसची कामे सुरु आहेत. त्यापैकी ३० डेमो हाउस बांधून पूर्ण झाल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

घरकुलाबरोबरच शौचालय, गॅस, नळ आणि वीजजोडणी -

घरकुल बांधणीबरोबरच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ६ लाख ३७ हजार ९७४ लाभार्थ्यांना घरकुलासोबत शौचालयाचा लाभ मिळवून देण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत ४ लाख ६८ हजार ३५१ लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा, प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ३ लाख ४७ हजार ७५१ लाभार्थ्यांना गॅस जोडणी, सौभाग्य योजनेअंतर्गत ३ लाख १९ हजार ६४८ लाभार्थ्यांना वीज जोडणी, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत ३ लाख ४४ हजार ८३४ लाभार्थ्यांना उपजिवीकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम केले आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

बहुमजली इमारती, घरकुल मार्टलाही चालना -

घरकुल योजनेअंतर्गत पुरेशी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारती बांधली जात आहे. आजपर्यंत ९२१ बहुमजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. जेथे पुरेशी जागा आहे, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधांयुक्त १९३ गृहसंकुल उभारली आहेत. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचे साहित्य एकाच छताखाली व जवळच उपलब्ध व्हावे, यासाठी आजपर्यंत ३४३ तालुक्यांमध्ये घरकुल मार्ट उभारले आहेत. प्रत्येक तालुक्यांत घरकूल मार्ट उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

लाभार्थ्यांना ७० हजार रुपयांचे कर्ज -

घरकुल बांधकामासाठी बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज स्वरुपात मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत २ हजार १७२ लाभार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवून दिले आहे. तसेच मुलभूत सुविधांद्वारे रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पथदिवे, नळजोडणी इत्यादी देण्यात आली असून १९ हजार ३०१ आदर्श घरकुलांची उभारणी केल्याची माहिती, मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details