मुंबई : भाजपच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकारी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असून सव्वाशे तासांच व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह ( Devendra Fadnavis pen drive bomb ) असल्याचा दावा त्यांनी ( Opposition leader Devendra Fadnavis accuses ) सभागृहात केला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार रोहित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पुरावे तयार केले जातात. काल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जे कागदपत्र पुरावे, ऑडिओ व्हिडीओ क्लिप ठेवले. त्याबाबत राज्य सरकार कडून त्याची सत्यता आणि पडताळणी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे पुरावे पेन ड्राईव्हच्या ( Devendra Fadnavis accuses ) माध्यमातून विधानसभा उपाध्यक्ष यांना दिले. त्यानंतर लगेचच ते प्रसार माध्यमांत जवळही देण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणात संशय निर्माण होतोय. पेगॅसेस सारखी टेक्नॉलॉजी वापरून पुरावे तयार करता येतात.