महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू, ५ नंतर संचारबंदी

मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. तसेच राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि. २८ जून) तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे.

संचारबंदी
संचारबंदी

By

Published : Jun 28, 2021, 1:58 AM IST

मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. तसेच राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने नवीन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार मुंबईतही सोमवारपासून (दि. २८ जून) तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. यामुळे दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. दरम्यान, हे निर्बंध अधिक कडक केले जाऊ शकतात, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईचा पॉझिटिव्हीटी दर वाढला

मुंबई महापालिकेच्या हद्दीत गेले दोन आठवडे ३.९६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आहे. तसेच २६.४ टक्के इतक्या ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहेत. ११ जून ते १८ जून या आठ दिवसात पॉझिटिव्हिटी दर ३.७९ टक्के इतका होता. २३.५६ टक्के बेडवर रुग्ण होते. मुंबईत पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईची भौगोलिक रचना व लोकसंख्या, लोकल ट्रेनने बाजूच्या जिल्ह्यातून दाटीवाटीने मोठ्या प्रमाणात येणारे प्रवासी, टास्क फोर्सने तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईमध्ये तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू राहतील असे परिपत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंतचा पॉझिटिव्हिटी दर

मुंबईत ४ ते ११ जून या आठ दिवसांच्या कालावधीत २ लाख ६९ हजर ५६९ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पॉजिटिव्हिटी दर ४.४० टक्के इतका होता. याच कालावधीत १२ हजार ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण होते. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त होते. एकूण बेड्स पैकी २७.१२ टक्के बेड्वर रुग्ण होते. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या स्तरात झाला होता. ११ ते १८ जून या कालावधीत १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त होते. २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते. मुंबईत २३.५६ टक्के बेडवर रुग्ण असल्याने राज्य सरकारच्या ब्रेक द चैन नियमानुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला होता.

लोकल रेल्वे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. मुंबईत मागील आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेन सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नव्याने आलेला डेल्टा प्लस हा व्हेरिएंट झपाट्याने पसरत असल्याने सामान्य नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा नसणार आहे.

काय सुरू, काय बंद राहणार

  • सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा
  • मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद
  • मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली
  • महत्त्वाची खासगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालय ५० टक्के उपस्थितीत सुरू राहण्यास मुभा
  • लग्नासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीतीची परवानगी
  • अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी
  • महत्त्वाच्या मिटिंगसाठी ५० टक्के उपस्थिती, केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा असेल.
  • शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल.
  • सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर ५ नंतर संचारबंदी लागू
  • जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील.
  • सार्वजनिक वाहतूक आसन क्षमता नुसार सुरू राहील.

हेही वाचा -लोकल ट्रेनच्या प्रवासावरून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवले ५१ प्रश्नांचे पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details