महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेचे जम्मूमध्ये होणार थेट प्रक्षेपण, 'कश्मीर पंडित ग्रुप' ने केले आयोजन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज ठाण्यात ( Raj Thackeray Public Meeting Thane ) होणाऱ्या सभेचे थेट प्रक्षेपण जम्मू शहरातही करण्यात येणार ( Raj Thackeray Meeting Live In Jammu ) आहे. तेथील काश्मीर पंडित ग्रुपतर्फे ( Kashmir Pandit Group Jammu ) हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याबाबत सोशल मीडियावर एक बॅनरही व्हायरल झाला ( Raj Thackeray Public Meeting Banner Viral ) आहे.

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचे जम्मूमध्ये होणार थेट प्रक्षेपण, 'कश्मीर पंडित ग्रुप' ने केले आयोजन
राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचे जम्मूमध्ये होणार थेट प्रक्षेपण, 'कश्मीर पंडित ग्रुप' ने केले आयोजन

By

Published : Apr 12, 2022, 5:44 PM IST

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात आज 'उत्तर सभा' होणार ( Raj Thackeray Public Meeting Thane ) आहे. या सभेत राज ठाकरे टीकाकारांवर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, हिंदुत्वाचा नवा मुद्दा घेतलेल्या राज ठाकरे यांनी यांना आता जम्मू-काश्मीर मधून पाठिंबा मिळताना दिसत आहे. कारण सध्या सोशल मीडियावर काश्मीर पंडित ( Kashmir Pandit Group Jammu ) ग्रुपचं एक बॅनर व्हायरल होत असून जोरदार चर्चा सुरू ( Raj Thackeray Public Meeting Banner Viral ) आहे. ही सभा जम्मू शहरात लाईव्ह दाखवण्यात येणार ( Raj Thackeray Meeting Live In Jammu ) आहे.


पोस्टर व्हायरल :राज ठाकरे यांच्या आज ठाण्यात होणाऱ्या या उत्तर सभेचे जम्मूमध्ये थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या प्रक्षेपणाचं आयोजन कश्मीर पंडित ग्रुपकडून करण्यात आले आहे. 'राजसहाब ठाकरे जी का भाषण देखने के लिए आये सभी माता भक्तों का स्वागत' अशा आशयाच पोस्टर कश्मीर पंडित ग्रुपकडून व्हायरल करण्यात येत आहे.


काय आहे बॅनर ? :'हिंदू जननायक राज साहेब ठाकरे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. उत्तर सभा लाईव्ह स्क्रीन. माननीय राज साहेब ठाकरे जी का भाषण देखने के लिए आये सभी माता भक्तों का हार्दिक स्वागत.' असे या बॅनर मध्ये म्हटलं आहे.


कुठं दाखवली जाणार सभा ? :या सभेसाठी नेमकं कुठं जमायचं त्यासाठी एक पत्ता सुद्धा देण्यात आला आहे. जम्मुच्या कटरा येथील हॉटेल दुर्गा रेसिडेन्सीचा पत्ता यात देण्यात आला आहे. दरम्यान, आज दिवसभर राज ठाकरे यांच्या बॅनर ती चर्चा असली तरी, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका झाल्यानंतर राज ठाकरे आज नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details