महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पावसाची संततधार सुरूच; राज्यातील इतर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पाऊस बरसत आहे.

मुंबई पाऊस
मुंबई पाऊस

By

Published : Jul 13, 2021, 4:43 PM IST

मुंबई -जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा राज्यात जोरदार हजेरी लावलेली आहे. हवामान विभागाने सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अ‌लर्ट जारी केले. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पाऊस बरसत आहे. सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, रायगड या तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीसह संपूर्ण विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. कोकणात दोन दिवसांपासून पावसाने दाणादाण उडविली आहे. काही भागात २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसरासह रत्नागिरीत जोरदार पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार असून, पुढील तीन तासांत राज्यातील सात जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


हवामान विभागाचा पुढील अंदाज

१३ जुलै :रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर पुणे जिल्हा घाटक्षेत्र, औरंगाबाद, जालना जोरदार पावसाची शक्यता आहे.

१४ जुलै :मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज. परभणी, हिंगोली, नांदेड हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.

१५ जुलै: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज.

हेही वाचा -विदर्भातील मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडले; १ हजार ६४ क्युसेक्स वेगाने विसर्ग

ABOUT THE AUTHOR

...view details