महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PM Modi On Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी रविवारी मुंबईत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने पहिला पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना देण्यात ( Lata Dinanath Mangeshkar Award 2022 ) येणार आहे. 11 एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 24 एप्रिल ला रविवारी मुंबई षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान स्वतः मुंबईत उपस्थित राहणार ( PM Modi Mumbai Tour ) आहेत.

PM Modi On Mumbai Tour
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला लता मंगेशकर पुरस्कार

By

Published : Apr 23, 2022, 4:13 PM IST

Updated : Apr 23, 2022, 4:31 PM IST

मुंबई-गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने पहिला पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना देण्यात ( Lata Dinanath Mangeshkar Award 2022 ) येणार आहे. 11 एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 24 एप्रिल ला रविवारी मुंबई षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान स्वतः मुंबईत उपस्थित राहणार ( PM Modi Mumbai Tour ) आहेत. लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात देशाप्रती केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

प्रतिनिधी माहिती देताना

हनुमान चालीसा पठणावरून राणा दाम्पत्याची माघार - दरम्यान, मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालीसा वाचणार होते. यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतले आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणायांनी केली आहे.

मुंबईत चोख सुरक्षा - पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली. असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Home Minister On PM Modi Mumbai Tour ) यांनी दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काश्मीरहून मुंबईत येणार पंतप्रधान - रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काश्मीर येथे एक व्यवस्थित कार्यक्रम आहे. हा नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईकडे येणार आहेत. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून उषा मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे अशी माहिती मंगेशकर परिवार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चारीटेबल ट्रस्टने ही माहिती दिली आहे.

आणखी कोणाचा होणार सन्मान - यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांचाही सन्मान होणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान गेल्या 32 वर्षांपासून समाजकार्य करीत आहे संगीत नाटक तसेच विविध कलेतील दिग्गजांना या ट्रस्ट द्वारे सन्मानित केले जाते दरवर्षी 24 एप्रिल ला म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा यंदा 80 वा स्मृतीदिन आहे.

मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत राणा म्हणाले की, महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेनं निघाली आहे. पंतप्रधान विकासाचा संकल्प घेऊन महाराष्ट्रात येत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटतंय की कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी, पंतप्रधानांचा दौरा रद्द व्हावा. हनुमान चालीसाचा एवढा विरोध का आहे? या महाराष्ट्राची व्यवस्था बिघडवण्याचं काम हे लोकं करत आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये आणि पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.

हेही वाचा -Rana Vs Shivsena Live Update : अखेर राणा दाम्पत्यांची माघार, आंदोलन घेतले मागे; नवनीत राणांची घोषणा

Last Updated : Apr 23, 2022, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details