मुंबई -मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नाही याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, केंद्राकडून राज्याला मदत आणण्यासाठी काही संधी असतात त्या राज्य सरकारने घेणे आवश्यक असते. पण दुर्दैव असे की, पुनः एकदा तिरस्काराच्या भूमिकेतून राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित राहिले नसावेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar on PM meeting) यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तीस राज्यातील मुख्यमंत्र्यांची तरुणाचा वाढता प्रादुर्भाव यावर बैठक बोलावली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले (MH cm skips pm Meeting) नाही. मुख्यमंत्री प्रत्येक वेळेला केंद्रावर टीका करतात की, कित्येक वर्षे कोविडची काढली. ज्या वेळेला पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत राज्याचे विषय मांडण्यासाठी बैठक बोलावतात. तेव्हा कोविड किंवा इतर विषयी बोलण्यासाठी येतात. तेव्हा कोविड अथवा इतर गोष्टी केंद्राकडे काही मागणे अपेक्षित होते. आज झालेल्या महापालिकेच्या एका छोट्याशा अॅपच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहतात, मार्गदर्शन करतात. मग दहा -बारा तासात काय अशी जादूची कांडी फिरते की प्रकृती ठणठणीत होते? असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.
Pravin Darekar on PM Meeting : राज्यसरकारची केंद्राच्या बाबतीत तिरस्काराची भूमिका स्पष्ट - प्रवीण दरेकर
केंद्राकडून राज्याला मदत आणण्यासाठी काही संधी असतात त्या राज्य सरकारने घेणे आवश्यक असते. पण दुर्दैव असे की, पुनः एकदा तिरस्काराच्या भूमिकेतून राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित राहिले नसावेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar on PM meeting) यांनी केली.
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती जाणवली
अहंकाराच्या भावनेतून मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती जाणवली. त्यांच्याऐवजी राजेश टोपे यांना बैठक अटेंड करायला लावली. परंतु पंतप्रधानांचा संवाद मुख्यमंत्र्यांशी होता. म्हणून मुख्यमंत्री असते तर काही पदरात पाडून घेणे, राज्याच्या हिताचे काही प्रश्न मांडणे सोयीचे ठरले असते. परंतु ते झाले नाही. यावरून केंद्र सरकारच्या बाबतीत राज्य सरकारची काय भूमिका आहे हे वारंवार स्पष्ट होत आहे. केंद्राकडून काही मिळवण्यापेक्षा केंद्र सरकारशी पंगा घेत केंद्र राज्य वातावरण तयार करत आपली राजकीय पोळी भाजायची अशी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्ट होते. हे सरकार अहंकाराने ओतप्रोत भरलेले आहे. कारण त्यांना आपल्या अहंकारापेक्षा राज्याचे विषयच महत्वाचे वाटत नाहीत. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांनी समन्वयातून विकास करायचा असतो. संस्था तसेच कारभार चालवायचा असतो असे मतं प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.