मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ( Malegaon Bomb Blast Case ) आज पुन्हा माजी एटीएस अधिकारी यांची उलट तपासणी करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप नेत्या तथा खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर ( MP Sadhvi Pragya Singh Thakur ) यांच्या वकिलाने तब्बल सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उलट तपासणी केली. या प्रकरणातील ही या आरोपीच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाची उलट तपासणी असल्याचे मानले जात आहे.
उद्या पुन्हा उलट तपासणी होणार -या प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यापासून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर ( Pragya Singh Thakur ) कोर्टामध्ये हजर झाल्या नव्हत्या. मात्र, ही साक्ष त्यांच्याकरता किती महत्त्वाची आहे हे त्यांना सुद्धा माहित आहे. त्यामुळे ते उलट तपासणी दरम्यान उपस्थित राहत आहे. आता या प्रकरणात उद्या पुन्हा उलट तपासणी होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्वात प्रथम तपास सुरू करणारे माजी एटीएस अधिकारी ठाकूर यांच्या वकिलाने केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, या सर्व प्रकरणाचा तपास शहीद वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मार्गदर्शना करण्यात आला आहे. त्यांनी सुचवलेल्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसारच या प्रकरणात तपास करण्यात आला होता.
वकील, तपास अधिकाऱ्यात शाब्दिक वाद - आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बेकायदेशीर कोठडीवर वकिलांच्याकडून विचारले असता साध्वी प्रज्ञा सिंग यांची कोठडी बेकायदेशीर नव्हती. ती कायद्याला धरूनच होती असे, एटीएस च्या माजी तपास अधिकाऱ्याने आज उलट तपासणी दरम्यान सांगितले आहे. आता या प्रकरणात पुढील उलट तपासणी उद्या पुन्हा शनिवारी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये दैनंदिन सुनावणी आज पार पडली. त्यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वकिलांकडून या प्रकरणातील माजी मुख्य तपास अधिकारी यांची उलट तपासणी करण्यात आली. त्यावेळी आज पुन्हा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे वकील, तपास अधिकारी यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद पहायला मिळाला.
काय आहे प्रकरण -29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर, समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.