मुंबई - पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणावरून भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडीला सातत्यानं लक्ष्य केले जात आहे. आज दिवसभर भाजपच्या महिला आघाडीकडून राज्यभरात संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. ही बैठक वर्षा निवास्थानी होणार आहे. या बैठकीत संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याची शक्यता?
पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणावरून भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडीला सातत्यानं लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा निवास्थानी बैठक बोलाविली असून या बैठकीनंतर संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी होती. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती आहे.