महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज ठाकरे यांची CID चौकशी करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

देशाच्या सुरक्षेबाबत इतकी गंभीर माहिती राज यांना जर होती. तर, त्याबद्दल त्यांनी तक्रार का दाखल केली नाही? असा सवाल याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेतून केला आहे.

By

Published : Apr 30, 2019, 9:31 PM IST

मनसे प्रमुख राज ठाकरे

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून सीआयडी चौकशी करा, अशा प्रकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले. याबाबत राज ठाकरे यांनी विवादित वक्तव्य केले होते. याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांची CID चौकशी करा

देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, असे राज यांनी आपल्या जाहीर भाषणात म्हटले होते. यानंतर पुलवामासंदर्भात यांनी वक्तव्य केल्यानंतर, देशाच्या सुरक्षेबाबत इतकी गंभीर माहिती राज यांना जर होती. तर, त्याबद्दल त्यांनी तक्रार का दाखल केली नाही? असा सवाल याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेतून केला आहे.

ही याचिका माजी पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याबद्दल राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करत त्यांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी एस. बालाकृष्णन यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details