मुंबई -भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेला शिवडी न्यायालयाने फेटाळल्यानंतर या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
काय आहे याचिका?
नवाब मलिकांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर 24 फेब्रुवारीला सुनावणी
मोहित कंबोज यांच्या याचिकेनुसार नवाब मलिक यांनी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झालेल्या याचिका दरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी याचिका मोहित कंबोज यांनी दाखल केली होती.
मोहित कंबोज यांच्या याचिकेनुसार नवाब मलिक यांनी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झालेल्या याचिका दरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी याचिका मोहित कंबोज यांनी दाखल केली होती. नवाब मलिक यांनी असे करून कोविड नियमांची, प्राकृतिक आपदा अधिनियमचा उल्लंघन केला आहे. आम्ही संबंधित पोलिसात तक्रार करून सुद्धा पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही. म्हणून त्यांच्या विरोधात आईपीसी कलम 156( 3 ) अंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.