महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अर्णब गोस्वामी प्रकरण : आरोपपत्राविरोधात आव्हान याचिका देण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

रायगड पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राला आव्हान देणारी याचिका गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयत दाखल केली होती. अखेर त्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

arnab goswami news
अर्णब गोस्वामी प्रकरण : आरोपपत्राविरोधात आव्हान याचिका देण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

By

Published : Dec 18, 2020, 2:58 PM IST

मुंबई - 2018 मधील अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांकडून अर्णब गोस्वामीसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. रायगड पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राला आव्हान देणारी याचिका गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयत दाखल केली होती. अखेर त्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर याचिका आल्यानंतर या संदर्भात अर्णब गोस्वामी यांनी संबंधित आरोपपत्राला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाने अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाला या प्रकरणातील सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आता पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे.

रिपब्लिकच्या 'सीईओ'ला जामीन

दरम्यान, रिपब्लिक वाहिनीचे सीईओ विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने टीआरपी घोटाळ्यासंदर्भात अटक केली होती. यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर न्यायालयाने विकास खानचंदानी यांची 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details