महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण मुंबईच्या बाजूच्या शहरात

मुंबईच्या बाजूच्या शहर आणि जिल्ह्यात म्हणजेच एमएमआर क्षेत्रात डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.

By

Published : Jun 21, 2021, 8:01 PM IST

कोरोना
कोरोना

मुंबई - देशभरात गेले जवळपास दोन वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाने दरवेळी आपले रूप बदलले आहे. सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण समोर येत आहेत. मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, मुंबईच्या बाजूच्या शहर आणि जिल्ह्यात म्हणजेच एमएमआर क्षेत्रात डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्ण स्थितीबाबत माहिती देताना

'डेल्टा प्लसचा रुग्ण नाही'

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आले असले, तरी धोका कायम आहे. तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज आहे. एमएमआर क्षेत्रात डेल्टा प्लस व्हेरिएंट या नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळले असल्याचे, म्हटले जात असले तरी अद्याप त्याबाबत स्पष्ट झालेले नाही. खबरदारी म्हणून मुंबईतील रोज ५० रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. मात्र, या अहवालात डेल्टा प्लस या नवीन स्ट्रेनचा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे काळजी करू नये. कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही काकाणी यांनी केले आहे.

'डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 20 रुग्ण'

राज्यातील पाच जिल्ह्यांमधून गोळा झालेल्या 20 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला. त्यानंतर आम्ही आणखी नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, त्याचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details