महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पंचगंगा सिडस कंपनीचा परवाना निलंबित : सचिव स्तरावर चौकशी होणार - कृषिमंत्री दादा भुसे यांची घोषणा

बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्या पंचगंगा सीड्स कंपनी औरंगाबाद ( Panchganga Seeds Pvt. Ltd. Aurangabad ) या कंपनीचा परवाना तत्काळ निलंबित करून, कृषी अधिकाऱ्यांची सचिव स्तरावर चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी सभागृहात केली.

By

Published : Mar 8, 2022, 3:29 PM IST

कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई :औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत तपासणी करण्यात आलेल्या, भेंडी आणि वांगी यांच्या बोगस बियाण्यांचा अवैध साठा ( Illegal stockpiling of bogus seeds ) आढळून आला आहे. त्याचबरोबर तपासणीदरम्यान पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद ( Panchganga Seeds Pvt. Ltd. Aurangabad ) या कंपनीनं विक्री परवाना नूतनीकरण केलेला नाही. तसेच तो दर्शनी भागावर लावलेला नाही, अशा अनेक नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे, लक्षवेधीच्या माध्यमातून अनिल पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली असता, जिल्हा कृषी अधिकारी दिलीप झेंडे ( District Agriculture Officer Dilip Zende ) यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची समोर आले आहे. त्यामुळे सदर झेंडे यांच्या निलंबनाची मागणी सभागृहात आमदारांनी केली. तसेच सदर कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली.

पंचगंगा बियाणे कंपनीचा परवाना निलंबित -

या लक्षवेधीला उत्तर देताना कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी सदर बोगस बियाणे कंपनीचा परवाना निलंबित करीत असल्याची घोषणा सभागृहात केली. तसेच या संदर्भात सचिव स्तरावर चौकशी समिती नेमण्यात येत असून, यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर या प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सभागृहात दिली. तसेच आतापर्यंत बोगस बियाणे विकणाऱ्या 620 विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला. असून 136 विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहितीही भुसे यांनी सभागृहातील दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details