मुंबई -शहरात गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस 8 ते 9 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होते. रवीवारी त्यात वाढ होऊन तब्बल 11 हजार 163 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात काही प्रमाणात घट होऊन आज 9857 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
74 हजार 522 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज 9857 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 62 हजार 302 वर पोहचला आहे. आज 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 797 वर पोहचला आहे. 3357 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 74 हजार 985 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 74 हजार 522 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 40 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 74 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 748 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 43 लाख 06 हजार 053 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या -