महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परदेशी शिक्षणासाठीच्या 'गेट'चे ऑनलाइन अर्ज सुरू

राज्यासह देशातील अनेक विद्यार्थी पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी बाहेर देशात जात असतात. या विद्यार्थ्यांसाठी 'गेट' या परिक्षेचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडी उशीराच पण ही प्रवेश परीक्षा राबवण्यात येणार आहे.

आयआयटी मुंबई
आयआयटी मुंबई

By

Published : Sep 12, 2020, 1:46 AM IST

मुंबई - भारतासोबतच युरोपीय देशांमध्ये कोरोना आणि त्याचा कहर अद्यापही सुरू आहे. अशातच आयआयटी मुंबईकडून आयोजित करण्यात येत असलेल्या आणि परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या गेट-2021 (GATE-2021)या परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करता यावी म्हणून एका संकेतस्थळाची शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

परदेशातील विविध नामांकित विद्यापीठांमध्ये इंजीनियरिंग त्यासोबतच विविध प्रकारच्या पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेट ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या परीक्षेसाठी आयआयटी मुंबईने शुक्रवारपासून कार्यक्रम सुरू केला असून यासाठी https://appsgate.iitb.ac.in/ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईकडून सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज करावा, असे आवाहन या परीक्षेचे आयोजक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी केले आहे.

गेट-2021 या परीक्षेचे आयोजन देशभरामध्ये आयआयटी मुंबई सोबतच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगळुरू, आयआयटी दिल्ली, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपुर, आयआयटी मद्रास आणि आयआयटी रूरकी या संस्थांच्या वतीने केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेचे वेळापत्रक यंदा उशिरा जाहीर झाले असले तरी विद्यार्थ्यांना त्यासाठीचा योग्य अवधी मिळावा म्हणून यासाठी खास लक्ष देण्यात आले आहे.

गेट- 2021 ही परीक्षा देशभरात 5 ते 7 फेब्रुवारी आणि 12 ते 14 फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. कोरोनास्थिती लक्षात घेऊन यासाठीची सर्व अर्ज प्रक्रियाही ऑनलाइन असणार असून परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थ्यांना येत्या 7 ऑक्‍टोबरपर्यंत आपली नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रक किंवा गुणपत्रिका किंवा इतर प्रमाणपत्र नसले तरी त्यासाठीची अट बंधनकारक नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षातील पात्र विद्यार्थ्यांनाही गेटच्या या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत.

हेही वाचा -विशेष बातमी : कोरोनाचा देवांनाही आर्थिक फटका, देणग्यांमध्ये घट

ABOUT THE AUTHOR

...view details