महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष : मुंबईत महामार्गावरील वेगमर्यादेवर ‘लेझर स्पीड गन’ अंकुश

मुंबईमध्ये सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पीड ब्रेकर लावला आहे. त्यामुळे शहरातील महामार्गावरील वाहनांची वेग मर्यादा ‘लेझर स्पीड गन’ च्या निगराणीखाली आली आहे. काय आहे स्पीडगन प्रणाली आणि काय आहेत वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाईत त्रुटी, जाणून घ्या ईटीव्ही भारत विशेषमध्ये..

Laser Speed ​​Gun
लेझर स्पीड गन

By

Published : Dec 29, 2020, 6:35 PM IST

मुंबई- मुंबईमध्ये सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या प्रणालीच्या साहाय्याने स्पीड ब्रेकर लावलाय. या प्रणाली अगोदर सुसाट गाड्यांनी अनेक अपघात शहरात घडले, ते चित्र कमी झाल्याचे सध्या दिसत आहे. शहरातील बायपासवरील व शहराला जोडणाऱ्या एक्सप्रेस वे वरील वाहनांची वेग मर्यादा आता ‘लेझर स्पीड गन’ च्या निगराणीखाली आहे. त्यामुळे शहरात वेग मर्यादा तोडली की फाईन हा भरण्याशिवाय गंत्यंतर नाही.

स्पीड गन कॅमेरा प्रणाली काय आहे -

अतिवेगात निघालेल्या वाहनाचा क्रमांक कॅमेरावरून टिपून त्याची माहिती वाहतूक यंत्रणेस देऊन कारवाई होणं म्हणजे स्पीड गन कॅमेरा प्रणाली होय. ज्या मोटर कारने ‘वेगमर्यादेचे उल्लंघन केले त्या वाहनाचा क्रमांक वाहतूक पोलिसांनी लावलेल्या लेझर कॅमेराद्वारे टिपून, सर्व माहिती आपोआप यंत्रणेत नोंदवली जाते व थेट वाहन चालकांना मोबाईलवर दंडाचा मेसेज जातो. हे तंत्रज्ञान परदेशातून विकसित झाले आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरात वाहतूक पोलिसांनी याच्या मदतीने वाहतूक अपघातावर नियंत्रण मिळवले आहे. हीच प्रणाली मुंबईतही कार्यरत आहे.

काय आहे वेग मर्यादा नियम व किती आहे दंड -

देशभरात रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असताना, याविषयीचा व कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या प्रश्नाची अत्यंत गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने मोटार वाहने कायदा, १९८८मध्ये सुधारणा करून मोटार वाहने (दुरुस्ती) कायदा, २०१९ हा १ सप्टेंबरपासून लागू केला. त्यानुसार अधिक वेगाने गाडी चालवणे यावर 1000 रुपये दंडात्मक कारवाई केली जाते.

कधी-कधी नंबर प्लेटच वाचली जात नाही, राजकीय-प्रशासकीय लोकांकडूनही विरोध -

ही प्रणाली मुंबईत राबवत असताना शेकडो वाहनांवर कॅमेऱ्यातून नंबर प्लेटच टिपली गेली नाही वा नंबर वाचता आला नाही, अशा त्रुटीं देखील मोठ्या प्रमाणात आहेत. असे या यंत्रणेत काम करणाऱ्या सूत्रांनी सांगितले. तसेच राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेतील अनेकांना ही प्रणाली नको आहे. कारण अनेकदा या प्रणालीद्वारे त्यांच्या गाड्यांवर देखील कारवाई होते.

कशी कारवाई होते -

पूर्वी द्रुतगती मार्गावर ताशी वेगमर्यादा ८० असावी असा नियम आहे. परंतु बहुसंख्य वाहने १०० ते १२० किलोमीटरच्या वेगाने धावायची. तसेच मुंबईतील बायपास मार्गावर वेग मर्यादा 35 अशी आखून दिली आहे. मात्र काही गाड्या 70 ते 80 च्या स्पीडने चालायच्या. त्यामुळे अनेक अपघात घडत होते मात्र आता स्पीड गण प्रणालीमुळे अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता महामार्गावर काही प्रमाणात स्पीडगन तैनात करण्यात आले आहेत. त्यानुसार वेग मर्यादा तोडणाऱ्यांवर कारवाई होते.

काही रस्त्यांची एकूणच लांबी पाहता स्पीड गन कुचकामी -

शहरात काही रस्त्यांची एकूणच लांबी पाहता स्पीड गन कुचकामी ठरत असल्याचेही चित्र आहे. जे.जे. सारखा उड्डाणपूल मार्ग आहे. त्यावर केवळ दोन स्पीडगन बसवण्यात आलेले आहेत. हा मार्ग अडीच किलोमीटरचा आहे. या ठिकाणी स्पीड गन आहे त्याठिकाणी वाहक गाडीचा वेग कमी करतात व ज्या ठिकाणी नाही तेथून गाड्या जादा वेगाने आणत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्पीड गन कुठे तरी कमी पडत असल्याचे चित्र दिसते.

वेगाने गाडी चालवून अपघाताचे प्रमाण मुंबईत सध्या कमी -

पोलिसांचा तिसरा डोळा म्हणजेच स्पीड गन कॅमेरा मार्फत मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात ट्रॅफिक पोलीस विभागाकडून 47 स्पीड कॅमेरे लावण्यात आले असून यांच्या मार्फत नोव्हेंबर 2020 च्या महिन्यात तब्बल वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 85,427 केसेस ई चलनद्वारे नोंदविण्यात आले आहेत. मुंबईत वेगाने गाडी चालवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होतात. दरवर्षी 8 हजार सरासरी अपघात मुंबईत अधिक वेगाने गाडी चालवल्याने होतात. त्यामानाने स्पीड गन कॅमेरा ही प्रणाली मुंबईत कमी प्रमाणात आहे असे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सांगतात. पण स्पीडगन ही प्रणाली लावल्यापासून मुंबईत अधिक वेगाने वाहन चालवून झालेले अपघात कमी प्रमाणात होत आहेत, असे देखील सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे.

वेग मर्यादेमुळे सायंकाळी ट्राफिक, कधी-कधी चुकीची कारवाई -

मुंबईत स्पीडगन ही प्रणाली राबविल्याने संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र जे जे तसेच अंधेरी व इतर मुंबईतील उड्णडा पूलांवर व रस्त्यांवर दिसते. कारण वेगमर्यादा आखून दिल्याने गाड्या धीम्या गतीने चालतात व यामुळे वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो असे मुंबईकर सामान्य नागरिक सांगतात. तसेच वेगमर्यादा व वाहतुकीचे नियम तोडल्यावर कारवाई करण्यासाठी जी प्रणाली राबवण्यात आलेली आहे. त्या प्रणालीमुळे कधीकधी चूक नसताना दुसऱ्याच वाहनांवर देखील कारवाई होते, अशी अनेक प्रकरणे मुंबईत घडलेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details