महाराष्ट्र

maharashtra

Non Teaching Staff Will Going Strike : महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २० डिसेंबर पासून जाणार संपावर

येत्या २० डिसेंबर २०२१ पासून राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारण्याचा इशारा अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाने शासनला ( Non Teaching Staff Will Going Strike ) देण्यात आला आहे. या संपापुर्वी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत काळया फिती लावून काम करणार ( Non teaching staff will work with black ribbon ) असल्याचे निवेदन राज्य सरकारला २० नोव्हेंबर २०२१ रोजी महासंघाच्या वतीने देण्यात आले आहे.

By

Published : Dec 13, 2021, 6:54 PM IST

Published : Dec 13, 2021, 6:54 PM IST

Non-teaching staff will go on strike
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २० डिसेंबर पासून जाणार संपावर

मुंबई -राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी येत्या २० डिसेंबर २०२१ पासून संप पुकारण्याचा इशारा अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाने शासनला देण्यात ( Non Teaching Staff Will Going Strike ) आला आहे. या संपापुर्वी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत काळया फिती लावून काम करणार ( Non teaching staff will work with black ribbon ) असल्याचे निवेदन राज्य सरकारला २० नोव्हेंबर २०२१ रोजी महासंघाच्या वतीने देण्यात आले आहे.

काय आहे मागण्या?

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजना लागू करणे. ७. डिसेंबर २०१८ व १९ फेब्रुवारी २०१९ चा अन्यायकारक शासन निर्णय रदद् करणे. सातवा वेतन आयोगात तीन लाभाची (१०.२०.३०) सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे. महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, महाविद्यालयातील रिक्त तिर पदे तात्काळ भरण्यासाठी मान्यता देणे. नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकेतर कर्मचान्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे. या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संप पुकारणार आहेत.

काळ्या फिती लावून कर्मचारी करणार काम -

संपाच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून येत्या १४ से १९ डिसेंबर २०२१ दरम्यान काळ्या फिती लावून काम करण्यात येईल. तसेच २० डिसेंबर २०२१ पासून बेमुदत संपात सहभागी होउन आंदोलन करण्यात येईल असा इशारा ११ डिसेंबर २०२१ रोजी रुईया महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या सभेमध्ये संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. आरबी सिंग व सरचिटणीस माधव राऊळ त्यांनी दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष सुदर्शन आये, पविण खामकर, जर्नादन पाटील, प्रकाश भूयाक, चिटणीस दिलीप मोरे, दिलीच पवार, रविंद्र कदम, सियामणी चौधे, निंबा पाटील महिला संघटक सोनाली लब्बे, सी. भोसले आदी पदाधिकारी, यूनिट प्रमुख तसेच बहुसंख्येंने कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा -PM Care Fund Petition : पीएम केअर्सच्या वेबसाईटवरून मोदींचे नाव हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details