मुंबई - राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज कोविड नियंत्रणासंदर्भात सादरीकरण झाले. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये सहा ठिकाणी टेलिमेडिसीन सुरू करण्यात येणार आहे. लवकरच टेलिमेडिसीन योजना ३६ जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. राज्यात कोरोनाची दुसरी लाट नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट नाही. कोविड केंद्रांकडून केल्या जाणाऱ्या मागणीपेक्षा ऑक्सिजनची निर्मिती अधिक असल्याने तुठवडा नाही. ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट करण्यात येणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्याच्या मंत्रिमंडळाची लवकरच टास्क फोर्स सोबत बैठक होणार आहे. ऑक्सिजन पुरवठा ऑडिट करण्यात येईल. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही आता डॅशबोर्ड उभारण्यात येणार आहे. मृत्यूदर वाढू नये, यासाठी सर्व दक्षता घेतली जात आहे. मृत्यूदर कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. बरे होण्याचा दरही 70 टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर हा गुजरातपेक्षा कमी आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.