मुंबई - विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून चांगलाच गदारोळ झाला. मराठा आरक्षणाची मागणी करत विरोधकांनी सदनात घोषणाबाजी केल्यानंतर सदनाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. विधान परिषदेचे आमदार विनायक मेटेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. मराठा आरक्षणाची चळवळ सुरू केली, त्यावेळी तुम्ही कुठे होता असा सवाल मेटेंनी उपस्थित केला. हा मराठा विद्यार्थ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो गांभीर्याने घ्यावा. गरीब मराठा समाजाच्या मुलामुलींनी शिकावं, पुढे जावं यासाठी संधी हवी, ती आरक्षणाच्या माध्यमातून मिळेल. फडणवीस सरकारने आरक्षण हायकोर्टात टिकवले मात्र सुप्रीम कोर्टाने ते फेटाळले असे मेटे म्हणाले. यावेळी बोलताना समाजाचे प्रश्न मांडून देत नसाल तर आम्ही सदनात यायचं कशाला सवाल मेटेंनी उपस्थित केला. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली. यावेळी विरोधकांनी ठाकरे सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. यानंतर सदनाचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले.
मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळानंतर कामकाज तहकूब
विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून चांगलाच गदारोळ झाला. मराठा आरक्षणाची मागणी करत विरोधकांनी सदनात घोषणाबाजी केल्यानंतर सदनाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
विधान परिषदेचे कामकाज पुन्हा तहकूब
विधान परिषदेचे कामकाज पुन्हा ३० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, ग्रामविकास मंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात शासकीय ठराव सभागृहात वाचण्यास सुरुवात केली. विरोधकांनी यावर आक्षेप घेतला. तर मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकार उद्या प्रस्ताव मांडून भूमिका स्पष्ट करणार आहे. तसेच सभापतींनी चर्चेला उद्या (मंगळवारी) बोलण्यास संधी दिली असे स्पष्ट केले. मात्र समाधान न झाल्याने विरोधकांनी गोंधळ घातला आणि ३० मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.