महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 758 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज (शनिवारी) कोरोनाचे 758 नवे रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 14 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 85 हजार 260 वर पोहचला आहे.

By

Published : Dec 5, 2020, 10:07 PM IST

mumbai corona
मुंबई कोरोना

मुंबई- आज मुंबईत 758 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण संख्या आटोक्यात आली. त्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेले काही दिवस रुग्ण संख्येत वाढ झाली होती.

रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी -

मुंबईत आज (शनिवारी) कोरोनाचे 758 नवे रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 14 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 85 हजार 260 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 889 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 402 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 59 हजार 539 वर गेला आहे. सध्या मुंबईत 13 हजार 262 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 257 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 243, दिवस तर सरासरी दर 0.27 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 450 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 369 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 19 लाख 71 हजार 736 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या

१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१
२१ नोव्हेंबर - १०९२
२२ नोव्हेंबर - ११३५
२३ नोव्हेंबर - ८००

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -

7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण

हेही वाचा -शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्यास तयार, सरकारचे शेतकरी संघटनांना आश्वासन

हेही वाचा -महापरिनिर्वाण दिन : सकाळी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना शासकीय सलामी

ABOUT THE AUTHOR

...view details