मुंबई - राज्यात वेगवेगळ्या शहरात महिलांवरील घरगुती अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात महिलांवरील अत्याचारात राज्य महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत.
संपत्ती विषयी 99 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामधील 92 प्रकरणं निकालात काढली आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या 33 तक्रारी आल्या असून राज्य महिला आयोगाने यातील 29 प्रकरणांत कारवाई केलीय.
कामाच्या ठिकाणी 108 महिलांनी छळ होत असल्याचे सांगितले. या संबंधी दाखल करण्यात आलेल्या तक्रांरीमध्ये 102 प्रकरणे निकाली काढली आहेत. राज्य महिला आयोगाकडे यासोबतच 291 विविध प्रकरणातील तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात 283 प्रकरणात राज्य महिला आयोगाने कारवाई केली आहे.
एनसीआरबीच्या अहवालात 2019 सालात महिलांसंदर्भातील सर्व गुन्ह्यांबाबत देशातील विविध शहरांची आकडेवारी जाहीर झाली असून यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई देशात दोन क्रमांकावर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या स्थानी मुंबई, तिसऱ्या क्रमांकावर बंगळूरू शहर आहे.
दिल्ली - 12 हजार 902
मुंबई - 6 हजार 519
बेंगळूरू - 3 हजार 486
जयपूर - 3 हजार 417
हैदराबाद - 2 हजार 755
वर्ष 2019 एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्य महिलांच्या सर्व गुन्ह्यांत देशात टाॅप - 5 वर आहे
बलात्कार करून हत्या
महाराष्ट्र 47
मध्य प्रदेश 37
उत्तर प्रदेश 34
आसाम 26
कर्नाटक 23
अॅसिड हल्ला संदर्भातील राज्यातील गुन्हे