मुंबई -महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १३ फेब्रुवारी रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चौफेर टिका केली आहे.
पडळकरांनी केलेला प्रकार हास्यास्पद- जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले की, आततायीपणा किती करायचा, या मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे. स्थानिक व्यवस्थापनाने ज्यांना निमंत्रित केले आहे. सन्मानाने ज्यांना बोलावले आहे. त्यांच्या हस्ते जे उद्घाटन आहे. त्यावरच लोक विश्वास ठेवतात. आता प्रसिद्धीसाठी काही लोक, काहीही करतात. त्यांच्याबद्दल काय सांगणार? हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे, असे प्रकार करणे केविलवाणे असल्याची टीकाही त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाडांचे पडाळकरांना आव्हान-
आज पहाटे लपून छपून चोर दरवाजाने आत जात चोरासारखे गोपीचंद पडाळकर यांनी ज्या माऊलीने स्वकष्टाने संपूर्ण भारतात आपले नाव कोरले. तिच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. अखंड भारतामध्ये सर्वाधिक देवळांचा जिर्णोद्धार कोणी केला असेल तर तो या माऊलीने केला. जी माऊली कधीच कुठल्याही राजवटीला घाबरली नाही आणि स्वत:च्या माध्यमातून एक संस्कारक्षम रयत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. ज्या पद्धतीने गोपीचंद पडाळकर हे शरद पवारांवर बोलले. ही संस्कृती त्या माऊलींची नव्हे. कुठल्याही दुसर्या धर्माचा या माऊलीने उपमर्द केला आहे, असे कुठेही दिसलेले नाही. मला वाटते, गोपीचंद पडळकर यांना एक कला उमगलेली दिसते. शरद पवारांवर टीका केली तर सकाळची हेडलाईन तुमच्या नावावर असते. अरे हिम्मंत होती तर अनावरण दुपारी करायचे, सांगून करायचे, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांना दिले आहे.
आडवे येऊन दाखवा-