महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले...

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही काही नागरिक रस्त्यावर घोळक्याने फिरत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

By

Published : Mar 23, 2020, 2:10 PM IST

Sharad Pawar
शरद पवार

मुंबई - कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत परंतु अतिशय गरज असेल, तरच घराबाहेर पडा. नाहीतर घराबाहेर पडू नका. केंद्र व राज्य सरकारने जे आवाहन केले आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सरकारी यंत्रणेला पुर्णपणे सहकार्य करावे असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवार


आपण करोनाविरोधातील विरोधातील लढा आपण जिंकू परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे, याची गांभीर्याने दक्षता घ्याल असे आवाहनही शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला केले.

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहेत, याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
इतर देशात गंभीर स्थिती आहे. त्या स्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन नागरिकांनी दक्षता घेतली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपणही गांभीर्याने घ्यायची गरज आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details