मुंबई - शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली होती. त्यावर आज नवाब मलिक यांनी तावडे यांना चांगलेच धारेवर धरले. तावडे हे बारावी पास नसावेत आणि त्यांची डिग्रीसुद्धा बोगस आहे. त्यामुळे त्यांनी आता बारावी उत्तीर्ण झाल्याचा दाखला दाखवावा आणि त्यानंतरच आमच्या जाहीरनाम्यावर टीका करावी, असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले.
विनोद तावडेंच्या बारावीच्या दाखल्यावर आता आम्हाला शंका - नवाब मलिक
ज्या व्यक्तीला कागद वाचता येत नाही, त्याला राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची डिग्री बोगस आहे. यावर आता आमचा पक्का विश्वास झाला आहे. परंतु त्यांनी आमच्या पक्षाचा जाहीरनामा वाचल्यानंतर जे वक्तव्य केले. त्यावरून ते बारावी पासही नसतील अशी शंका आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा बारावीचा दाखला दाखवावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. ज्या व्यक्तीला कागद वाचता येत नाही, त्याला राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे सांगत मलिक यांनी तावडे यांना फटकारले.
तावडे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत जाहीरनामा कुणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तयार केला की काय असा प्रश्न उपस्थित करून त्याची खिल्ली उडवली होती. त्यावर आज नवाब मलिक यांनी तावडे यांना चांगलेच धारेवर धरले.