मुंबई - वक्फ बोर्डात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केला आहे. त्यावर गरज पडल्यास आपण स्वतः ईडी कार्यालयात जाऊ. मात्र, किरीट सोमैया ( nawab malik criticize kirit somaiya ) यांनी ईडीचे प्रवक्ते बनू नये. ईडीने जर त्यांना प्रवक्ते बनवले असेल तर, तसे त्यांनी जाहीर करावे, असा टोला नवाब मलिक यांनी किरीट सोमैया यांना लगावला.
हेही वाचा -शरद पवारांच्या जुन्या भाषणांचे 'नेमकचि बोलणें' पुस्तकाचे प्रकाशन, पवारांनी सांगितले अनेक किस्से
आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, असे ट्विट नवाब मलिक यांनी केले होते. आपण घाबरत नाही. अन्यायाच्या विरोधात आपण अजून जोरदार लढा देऊ, असे आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते. तसेच, वक्फ बोर्डात भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांचा घोटाळा आपण लवकरच समोर आणू, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.