महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Navneet Rana health : खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली, भायखळा कारागृह रुग्णालयात उपचार सुरू

भायखळा तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana health Byculla Jail Mumbai ) यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना भायखळा कारागृह रुग्णालयात ( Navneet Rana health news ) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

By

Published : Apr 25, 2022, 10:14 AM IST

Navneet Rana health deteriorated mumbai
नवनीत राणा तब्येत भायखळा जेल

मुंबई - भायखळा तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana health Byculla Jail Mumbai ) यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना भायखळा कारागृह रुग्णालयात ( Navneet Rana health news mumbai ) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शासकीय कामांत अडथळा आणल्याचा राणा ( Navneet Rana jail news ) दाम्पत्यावर ठपका असून, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Navneet Rana judicial custody by mumbai court ) सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -BJP delegation: भाजप आक्रमक शिवसेने विरोधात शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिव, मंत्र्यांना भेटणार

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana Byculla Jail Mumbai ) व आमदार रवी राणा यांनी दिला होता. शुक्रवारी त्या मुंबईत दाखल झाल्या. शिवसैनिक यामुळे संतप्त झाले. राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला वेढा घालून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी राणा दाम्पत्याला कायदेशीर नोटीस बजावून मुंबईतील कायदा व्यवस्था बिघडल्यास कारवाई केली जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, तरीही राणा दाम्पत्याने मुंबईत येऊन सोशल माध्यमातून सातत्याने भडकावू विधाने केली. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री राणा दाम्पत्याला अटक केली.

रविवारी बांद्रा येथील न्यायालयात राणा दाम्पत्याला हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली. आज नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली असून कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांच्या जिवाला धोका असल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, नवनीत राणा यांना इतरत्र रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Loudspeaker controversy: भोंग्याच्या वादावर बोलावलेल्या बैठकीला राज ठाकरेंची अनुपस्थिती!

ABOUT THE AUTHOR

...view details