महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मुख्यमंत्र्यांच्या जवळील ठेकेदारांसाठी मुंबई महापालिकेच्या खासगीकरणाचा डाव'

मुंबई महापालिका आयुक्तांनाही महापालिका आर्थिक संकटात येणार असून त्यासाठी अनेक विभागाचे खासगीकरण करून सर्व कामकाज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जावे, अशा आशयाचे एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील सर्व कामे मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले कंत्राटदार प्रसाद लाड आणि चेंबूर येथे राहणारे व मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रोज येरझाऱ्या मारणारे नीरज गुंडे यांना देण्याचा घाट घातला असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. महानगरपालिकेचे ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येवू शकते, असा सवाल मलिक यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

By

Published : Oct 3, 2019, 7:34 PM IST

Updated : Oct 3, 2019, 7:49 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील ठेकेदारांना आणखी फायदा करून देण्यासाठी मुंबई महापालिकेला आर्थिक संकटात आणण्याचा घाट महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आणि घातला असून तो आम्ही उधळून लावू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

मुंबई महापालिका आयुक्तांनाही महापालिका आर्थिक संकटात येणार असून त्यासाठी अनेक विभागाचे खासगीकरण करून सर्व कामकाज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जावे, अशा आशयाचे एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील सर्व कामे मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले कंत्राटदार प्रसाद लाड आणि चेंबूर येथे राहणारे व मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रोज येरझाऱ्या मारणारे नीरज गुंडे यांना देण्याचा घाट घातला असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. महानगरपालिकेचे ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येवू शकते, असा सवाल मलिक यांनी केला.

हेही वाचा -'ईडी'च्या प्रेमप्रकरणातून पक्षांतर वाढले - शरद पवार

भाजपचे ठेकेदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. तर, नीरज गुंडे हा प्रसाद लाड यांच्याजवळचा ठेकेदार असून तो सध्या मनपाची कामे घेत आहे. खासगीकरण करुन मनपा आयुक्त व ठेकेदार मनपाच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचे कटकारस्थान आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. प्रसाद लाड यांच्या जवळच्या ठेकेदारांना ठेका दिला गेला आहे. आता आयुक्तांनी काढलेल्या नोटमध्ये असा डाव असून थकीत कर वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आयटी व तंत्रज्ञानाचा वापर करा, असे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरुन नागपूरच्या कंपनीला म्हणजेच मुख्यमंत्री यांच्या जवळच्या कंपन्यांना कामे मिळावी यासाठी हे धोरण राबवले जात असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा -एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागत - छगन भुजबळ

नीरज गुंडे हा दररोज कमिशनरच्या घरी, मुख्यमंत्री यांच्या घरी का जात असतो. प्रसाद लाड यांनाच का ठेका दिला जातोय असा असा सवाल करतानाच मुंबईकरांवर कर वसुलीचा डाव भाजप - सेना आखत असेल तर तो डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला. कोण हा नीरज गुंडे दररोज कमिशनर, मुख्यमंत्री आणि मातोश्रीवर का दिसतो. मुंबईचे वाटोळे करण्यासाठी प्रसाद लाड आणि नीरज गुंडे यांना नेमले आहे का? असा संतप्त सवालही नवाब मलिक यांनी केला.

Last Updated : Oct 3, 2019, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details