महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Satish Uke Case : सतीश उकेंना 6 एप्रिल पर्यंत ईडी कोठडी; पीएमएलए कोर्टाचा निर्णय

नागपूरमधील वकील सतीश उके यांना ईडीने गुरुवारी अटक केली ( Satish Uke Arrest ED ) होती. त्यानंतर आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केले असता 6 एप्रिल पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली ( Satish Uke ED Custody Till 6 April ) आहे.

Satish Uke
Satish Uke

By

Published : Apr 1, 2022, 8:04 PM IST

मुंबई -सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने गुरुवारी नागपूरमधील वकील सतीश उके ( Satish Uke Arrest ED ) आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सतीश उके यांची 12 तास चौकशी करण्यात आली. चौकशीअंती ईडीने सतीश उके यांनी अटक करण्याचा निर्णय घेतला. आज ( शुक्रवार ) मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर उके बंधूना 6 एप्रिल पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली ( satish uke money laundring case Till 6 April ) आहे.

न्यायालयात युक्तीवाद करताना ईडीने म्हटले की, आरोपी तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही. त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची कोठडी देण्यात यावी. तसेच, छगन भुजबळ यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातला संदर्भ देखील ईडीने न्यायालयासमोर ठेवला आहे.

सतीश उकेंचे वकील रवी जाधव प्रसारमाध्यमांशी बोलताना

कागदपत्रे, मोबाईल जप्त -गुरुवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्या नागपूर येथील घरावर छापा टाकला होता. यावेळी ईडीने सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. ईडीने सतीश उके आणि त्यांच्या बंधूंना कोणत्या प्रकरणात अटक केली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

लोया प्रकरणात दबाव - मी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींविरोधात खटले लढलो आहे. न्या. लोया प्रकरणात माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मला धमकावण्यात आले असल्याचा दावा उके यांनी आपल्या युक्तिवादात केला. मला ताब्यात घेताना सांगण्यात आले नाही की कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले जात आहे. 2016 मध्ये लोयांची केस हाताळताना माझावर हल्ला झाला होता. मी पोलीस तक्रार केली पण घेतली नाही. माझ्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती सतीश उके यांनी न्यायालयात दिली आहे.

मी झोपेत असताना माझ्या बेडरूममध्ये सीआरपीएफचे जवान - यानंतर उके यांनी स्वत: युक्तिवाद केला. मी झोपेत असताना माझ्या बेडरूममध्ये सीआरपीएफचे जवान AK47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. अशा वेळी घरात घुसून कारवाई करण्यात आली. मी आधी आर्किटेक्ट होतो. नंतर कायद्याचे शिक्षण घेऊन 2007 साली वकिली सुरू केली. मी फडणवीस-गडकरी यांच्या विरोधात खटले लढले, असे उके यांनी युक्तिवादात सांगितले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut's warning to BJP : राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला कायदेशीर मार्गाने हात घालणार - राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details