मुंबई - मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी गेले वर्षभर लसीकरण मोहीम सुरू आहे. आता केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे ९२ लाख ३६ हजार नागरिकांना २७५ सेंटरवर बूस्टर डोस देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियोजन केले जात आहे.
Booster Dose in Mumbai : : ९२ लाख मुंबईकरांना बूस्टर डोस देण्यासाठी पालिकेचे नियोजन
कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावर त्यानंतर ९ महिन्यांनी ‘प्रिकॉशन डोस’ देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही, पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बूस्टर डोस -मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. काही कालावधीतच रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईत लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू झाली. वर्षभरात दिलेल्या लक्षानुसार मुंबईमधील १०० टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर दुसऱ्या डोसपासून ९ महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येतो. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना ‘प्रिकॉशन डोस’ (बूस्टर डोस) देण्यात येत आहे. त्यानंतर आता १८ वर्षांवरील सर्वांनाच ‘प्रिकॉशन डोस’ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पालिकेनेही कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी सुमारे पाच हजार कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन लसीकरण केले जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारची नियमावली आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ही ते म्हणाले.
अशी राबवणार मोहीम - कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावर त्यानंतर ९ महिन्यांनी ‘प्रिकॉशन डोस’ देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही, पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.