मुंबई -ऑनलाइन व्यवहार करताना मुंबईत लाखो रुपयांची ( Mumbai Woman Cheated ) फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. एक पिझ्झा एका आजीबाईंना चक्क अकरा लाख रुपयांना पडला ( Woman Cheated While Ordering Pizza ) असून ऑनालाईन खरेदीच्या नादात आणि अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कशी झाली फसवणूक? -
मुंबईच्या अंधेरी येथील रहिवासी असलेल्या या आजीला ऑनलाइन पिझ्झा आणि ड्रायफ्रूट ऑर्डर केली होती. त्यासाठी त्यांनी पैसे पाठविले. पण, बिलापेक्षा अधिक रक्कम त्यांनी चुकून पाठवली. ती परत कशी मिळवायची? या विवंचनेत त्या होत्या. त्यासाठी त्यांनी गुगलवर शोध घेतला. ऑनलाइन रक्कम परत मिळविण्याची माहिती देणारा एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला आणि येथेच घोळ झाला. तेव्हा त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्या अॅपवरून सायबर चोरट्यांनी त्यांचे बँक डिटेल, पासवर्डची माहिती घेतली. नंतर १४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून तब्बल ११ लाख रुपये गायब झाल्याचे त्यांना लक्षात आले.